घराचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून १० लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; पतीविरूद्ध गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :घराचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत, या माणीसाठी विवाहतेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती परिसरातील एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नोकरी करत होता व काही दिवसांपासून तो बेपत्ता होता. 


याबाबत श्रीरामपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरातील कांदा मार्केटच्या मागे शेळके हॉस्पिटलजवळ राहात असलेल्या उषा अभिजित पटारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सासरी नांदत असताना पती अभिजित मच्छिंद्र पटारे याने २०१४ पासून बंगल्याचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी शिवीगाळ, मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. 

तसेच घरातील कपाटात ठेवलेल्या चार तोळे गंठणाची परस्पर विल्हेवाट लावली. या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी पटारेविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला असून पटारे यास अटक केली आहे. काही दिवसांपासून पटारे बेपत्ता होता. 

याबाबत पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती आणि पोलीस त्याला शोधत होते. काल पोलिसांनी त्याचा शोध घेतल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तेथेच त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.