सांगलीत गर्भवतीवर आठ जणांचा बलात्कार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-तासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका विवाहित आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर तिच्या पतीला कारमध्ये डांबून ठेवून आठ जणांनी बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी तासगाव पोलिसांत पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. 


सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद व अनोळखी चौघे (पूर्ण नावे, पत्ता नाही) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, त्या महिलेने वैद्यकीय चाचणीस नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास तासगाव पोलीस करीत असून याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
Loading...

तासगाव पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, पीडित महिला ही माण तालुक्यातील आहे. ती पतीसह गोंदवले परिसरात हॉटेल व्यवसाय करते. त्यांच्या हॉटेलमध्ये कामासाठी एक विवाहित जोडपे हवे होते. याचा शोध ते घेत होते. दरम्यान, मुकुंद माने याने महिलेच्या पतीला फोन करून तुरची फाटा येथे एक जोडपे आहे. वीस हजार रुपये देण्यासाठी घेऊन या, असे सांगून बोलावून घेतले. 

मंगळवारी सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास हे पती-पत्नी तुरची फाटा येथील एका चाळीजवळ पैसे घेऊन आले. आल्यानंतर मुकुंद याने त्याच्या सोबत असलेल्या सागरला 'यांना मारा' असे सांगितल्यानंतर सागरने दोघांनाही प्लास्टिकच्या पाइपने मारहाण करण्यास सुरुवात केली.

यानंतर पीडित महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची सोनसाखळी तसेच रोख २० हजार काढून घेतले. यानंतर दुचाकीवरून आणखी चौघे त्याठिकाणी आले. महिलेच्या पतीला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये डांबून ठेवले व महिलेला जबरदस्तीने ओढून तेथीलच एका खोलीमध्ये नेले. 

या वेळी पीडितेवर जबरदस्ती करत असताना तिने 'मी आठ महिन्यांची गर्भवती आहे, मला सोडा,' अशी विनवणी केली. मात्र वरील सर्वांनी पीडितेवर बलात्कार केला. यानंतर पतीला त्याठिकाणी आणून, 'इथून गप्प निघून जायचे, पोलिसांत जाऊ नका, तुमचे कोणी ऐकणार नाही, मी इथलाच आहे,' असे सांगून दम दिला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.