पतीकडून पत्नीला शाळेतच लाथाबुक्क्यांनी मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्वत:च्या मुलाचा दाखला आणण्यास गेलेल्या महिलेला पतीने शाळेतच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील गणोरे येथील छत्रपती विद्यालय येथे घडली. याप्रकरणी पतीसह त्याचे दोन पुतणे व शाळेच्या मुख्यध्यापकांविरूद्ध अकोले पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Loading...
अकोले पोलिसांत वंदना भागवान वाकचौरे (वय ४०, रा. वीरगाव, हल्ली रा. शिवाजीनगर, सिन्नर, जि. नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, माझे पती भगवान भागवत वाकचौरे (रा.वीरगाव) आम्हा दोघांमध्ये एक महिन्यापासून भांडणतंटा होत असल्यामुळे, मी माहेरी राहते. 

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास छत्रपती विद्यालय गणोरे येथे मुलाचा दाखल आणण्यासाठी गेले असता तेथील मुख्याध्यापक इरणक यांनी मला सांगितले की, तुम्हाला थोडावेळ थांबावे लागेल. त्यानंतर माझे पती यांना फोन करून बोलावून घेतले. 


पती आल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापक यांना सांगितले की, मुलगा पियुष याचा शाळा सोडल्याचा दाखला माझ्या पत्नीकडे द्यायचा नाही, असे म्हणाले असता इरणक यांनी माझे वडिलांना शिवीगाळ केली. त्यावेळेस माझे पती भगवान वाकचौरे यांनी मला लथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. 


तसेच हातातील कशानेतरी माझ्या डाव्या हाताच्या मनगटावर मारले. त्याचवेळी माझे पुतणे गणेश अण्णासाहेब वाकचौरे व संकेत चंद्रकांत वाकचौरे यांनी पण मला शिवीगाळ केली. तुझ्या माहेरच्या नातेवाईकांकडे पाहून घेतो. हातपाय मोडून टाकतो, अशी धमकी दिली, असेही वंदना वाकचौरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.


यावरून आरोपी मुख्याध्यापक इरणक (रा. गणोरे), भगवान वाकचौरे, गणेश वाकचौरे, चंद्रकांत वाकचौरे (रा. वीरगाव) यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.