कोपरगावात डाळींब ६ हजारांवर!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव येथील बाजार समितीत  झालेल्‍या डाळींब लिलावात नंबर एकच्या डाळींबाला ६ हजार रुपये क्विंटल असा उच्‍चांकी भाव मिळाला, अशी माहिती बाजार समिती सभापती संभाजी रक्‍ताटे यांनी दिली. 


Loading...
कोपरगाव बाजार समितीत सोमवार, बुधवार व शुक्रवार डाळींब लिलावाचे वार असल्‍याने सोमवारी ५ हजार ४८७ कॅरेट डाळींब आवक झाली होती. त्‍यावेळी एक नंबर डाळींब ४ हजार ते ६ हजार रुपये क्विटंल, दोन- २ हजार ५०० ते ३ हजार ७५०, तीन- २५० ते २ हजार २५० रूपयांनी गेला. चांगला भाव मिळाल्‍याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. 

सभापती रक्‍ताटे म्‍हणाले, आपली शेतीमाल आपल्‍याच बाजार समितीत आणल्‍याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चाची बचत होते. विशेष म्‍हणजे अधिकृत मापाड्यामार्फत चोख व त्‍वरीत वजनकाटा, अधिकाऱ्यामार्फत लिलाव, योग्‍य भाव, रोख पेमेंट आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. डाळींब लिलावास आणताना प्रतवारी करून आणावा,असे आवाहन समितीचे आवाहन उपसभापती राजेंद्र निकोले व प्रभारी सचिव परसराम सिनगर यांनी केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.