थकबाकीपोटी सत्ताधारी भाजपचं कार्यालय मनपाकडून सील.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेच्या पथकाने मालमत्ता कराची थकबाकी असल्याने शहर भाजपचे कार्यालय सील केल्याची कारवाई केली आहे. मालमत्ताधारकांना आवाहन करुन देखील वेळेत पैसे न भरल्यामुळे महापालिकेकडून जप्ती मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत महापालिकेच्या पथकाने गुरुवारी दुपारी (दि. २) शहर भाजपचे गांधी मैदानाजवळ असलेले कार्यालय सील करण्यात आले. दरम्यान, या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

महापालिकेच्या माळीवाडा प्रभाग समिती कार्यालयाचे प्रभारी प्रभाग अधिकारी प्राजित नायर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. नगर शहर भाजपाच्या कार्यालयाकडे महापालिकेच्या २ लाख ४४ हजारांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी महापालिकेने थेट कारवाई करत या कार्यालयाला सील ठोकले आहे. 


Loading...
महापालिकेचे आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने शहरात कर न भरणाऱ्या आणि मोठी थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे महापालिकेने सध्या थकबाकीदारांना जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली असून शहरातील गांधी मैदानाजवळ असलेल्या भाजपाच्या कार्यालयाकडे २ लाख ४४ हजार रुपयांची थकबाकी असल्यामुळे नोटीस बजावून देखील पैसे न भरल्यामुळे महापालिकेच्या पथकाने गुरुवारी दुपारी (दि. २) ही कारवाई केली आहे
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.