भाजपचे नगरसेवकांना आमिष पक्षप्रवेश करा,निवडणूक खर्च आम्ही करू !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जळगाव व सांगली महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता आल्याने नगरमध्येदेखील तो इतिहास घडणार, अशा आवेशात असलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अन्य पक्षांच्या मातब्बर नगरसेवकांना लक्ष्य केले असून त्यांना 'भाजपवासी' करण्यासाठी वेगवेगळ्या आमिषांची खैरात केली जात आहे

Loading...
प्रभागाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली आहे. हक्‍काचे मतदार अन्य प्रभागात गेल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांनी स्वतंत्र यंत्रणा उभी करून प्रभागाचा सर्व्हे सुरू केला आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना अशी महत्वपूर्ण लढत होणार आहे. 

निवडून येण्याची क्षमता असलेल्या अन्य पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांना भाजपवासी करण्यासाठी जाळे टाकले आहे. या जाळ्यात नगरसेवकांना अडकविण्यासाठी विविध प्रकारची आमिषे दाखविण्यात येत आहेत.

त्यासाठी निवडणूक खर्चाची हमी घेतली जात असून सुरुवातीलाच काही रक्‍कम टोकन म्हणून देण्याची तयारी दर्शविण्यात येत आहे. डोळ्यासमोर लाखांचे आकडे उभे केले जात आहेत. त्यामुळे डोळे फिरणारच अशी अवस्था विद्यमान नगरसेवकांची झाली आहे. 

गरसेवकांना गळाला लावण्यासाठी भाजपकडून खास पदाधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आश्‍वासनासह आमिषांची खैरात केली जात आहे. अर्थात या प्रक्रियेत दुसरा गट अद्यापही बाजूला आहे. एकाच गटाकडून महापालिका निवडणुकीची आखणी केली जात आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.