दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने युवकास मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याप्रकरणी सर्जेपुरा येथील युवकास मारहाण झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादविकच्या ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. 


Loading...
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजीव मारुती कासार (वय १९, रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा) हा कामावरुन घरी जात असताना जैरीफ अय्याज शेख याने त्याला अडविले. दारु पिण्यासाठी पैसे दे अशी मागणी शेख याने कासार याच्याकडे केली असता त्याने नकार दिला. 

पैसे दिले नाही तर तुला मारुन टाकीन असे म्हणत जैरीफ शेख याने राजीव कासारला शिवीगाळ, दमदाटी, धमकी देत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकीही त्याने दिली. कासार याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास हेकॉ. रोकडे हे करीत आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.