पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून ठार मारण्याचा प्रयत्न


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून एकास गुप्तीने भोकसून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बोधेगाव येथे सोमवार, दि.२७ रोजी घडली. याप्रकरणी शेवगाव पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. 

Loading...
याबाबत मिळालेली माहिती की, तालुक्यातील बोधेगाव येथील कुढेकर वस्तीवरील बबन किसन भवार (वय ३८) रा. कुढेकरवस्ती, बोधेगाव याने आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून सोमवार, दि. २७ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सुनील रामा कुढेकर (वय ३०) याच्या पोटात गुप्ती भोकसून त्याचा कोथळा बाहेर काढला तसेच त्याच्या बरगडी व तोंडावर वार करून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

ही घटना त्यांच्या वस्तीत सामरे गुरुजींच्या शेतात घडली. जखमी सुनील कुढेकर यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानदेव कुढेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बबन भवार याला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता, शनिवार, दि. १ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.