श्रीगोंदा तालुक्यात गळफास घेऊन एकाची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील भाऊसाहेब कोंडीबा शेलार (वय ४८) या शेतकऱ्याने घरातील पंख्याला ओढणीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज दि. २९ रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
Loading...

याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबची माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात आज दि. २९ रोजी दुपारच्या वेळी भाऊसाहेब कोंडीबा शेलार यांचे गावातील काही इसमांबरोबर जोराचे भांडण झाले. 


ही माहिती मयताचा मुलगा भाऊसाहेब शेलार याला मिळताचे त्याने आपल्या दुचाकीवरून वडिलांना घरी नेऊन सोडले. व तो शेतात गेला असता, दुपारी दीडच्या सुमारास भाऊसाहेब शेलार यांनी घरातील पंख्याला ओढणीच्या सह्याने गळफास घेतला असल्याची माहिती प्रवीण यास शेजाऱ्यांनी फोनवरून दिली. 


प्रवीण याने तत्काळ घरी जाऊन पहिले असता, त्यास वडील मयत झालेल्याचे दिसून आले. याबाबत प्रवीण याने बेलवंडी पोलीस ठाण्याला माहिती देऊन शेलार यांचा मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.