नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्‍यातील घारगाव येथील बसस्थानक परिसरात नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 35 ते 40 वयाच्या अज्ञात युवकाचा पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी आठच्या सुमारास घडली.

Loading...
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव परिसरात रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात यापूर्वी झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थांच्या मागणीनंतर महामार्ग प्रशासनाने घारगाव येथे दुभाजकावर लोखंडी जाळ्या लावल्या आहेत. बस स्थानक परिसरात नागरिकांसाठी भुयारी मार्ग आहे. मात्र या भुयारी मार्गात नेहमीच अस्वच्छता, घाण व अंधाराचे साम्राज्य असते.

त्यातील विजेचे बल्ब फुटल्याने किंवा चोरीला गेल्याने याचा फारसा वापर रात्रीच्या वेळी होत नाही.घारगाव बस स्थानक महामार्गाच्या दोन्ही बाजूने व्यापारी गाळे, बाजारपेठ असल्याने नागरिक जीवाची पर्वा न करता रस्ता ओलांडणाऱ्यांना थांबविण्यासाठी दुभाजकावर लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. त्यातील फटीतून अनेकजण अद्यापही रस्ता ओलांडतात.

घारगाव बसस्थानक परिसरात असलेल्या उड्डाणपुलामुळे या ठिकाणी पुण्याकडून येणारी वाहने भरधाव वेगात येतात. या अपघातानंतर नागरिकांनी 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवली मात्र अपघातातील मृत व्यक्‍ती पाहिल्याने त्यांनी नकार दिला. 


त्यामुळे खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आली तोपर्यंत सुमारे 25 मिनिटे मृतदेह तेथेच पडून होता. या अपघातानंतर संगमनेरच्या दिशेने भरधाव जाणारा ट्रक (आर. जे. 02 जी. ए. 8715) आंबी खालसा फाट्यावर घारगाव पोलिसांना आढळला. चालक फरार झाला आहे. पोलिसांनी तो ट्रक घारगाव पोलिस ठाण्यात आणला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.