चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील धोत्री येथे सात ते आठ चोरट्यांनी जाधव वस्ती येथे पती-पत्नीवर सत्तूरसारख्या धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेत चोरटयांनी ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पती अजिनाथ निवृत्ती जाधव व पत्नी नर्मदा अजिनाथ जाधव (रा.जाधव वस्ती, धोत्री) हे दोघे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रात्री नगर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत चार अज्ञात चोरांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Loading...
दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. 
चोरटयांनी मारहाण केलेल्या जाधव कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. ते आपली उपजीविका शेती व ऊसतोडणी मजूर म्हणून काम करून भागवतात. चोरटयांनी फिर्यादी अजिनाथ जाधव यांच्या नाकावर वार करून गंभीर जखमी केले असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च सांगितला आहे. त्यामुळे या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच याप्रकरणी दरोडयाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.