मनपा निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढणार - खा. गांधी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे. येणारी महानगरपालिका निवडणूक ही भारतीय जनता पार्टी स्वबळारवच लढणार असून, त्यादृष्टीने शहरात बुथ रचनाही पूर्ण झाल्या आहेत. प्रत्येक प्रभागात पक्ष प्रभावी व निवडणून येण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी देणार आहे. ही महानगरपालिका निवडणूक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढणार आहे, असे असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी केले.


Loading...
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी यांनी लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते एल.जी.गायकवाड होते. बैठकीच्या सुरुवातीलाच देशाचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व केरळ येथील अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहर भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात निधी, वस्तू संकलन करणार असून, यासाठी लवकरच मदतफेरी काढणार असल्याचे खा.गांधी यांनी सांगितले.. यावेळी सरचिटणीस किशोर बोरा, नगरसेवक सुवेंद्र गांधी, मनोज दुलम, जगन्नाथ निंबाळकर, चेतन जग्गी, संगीता खरमाळे, अन्वर खान, नितीन शेलार, विवेक नाईक, किशोर वाकळे आदींसह मंडल प्रमुख, बुथ प्रमुख व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.