भगवान गड अस्थिर करण्याचे राजकीय कारस्थान रचले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  भगवान गड अस्थिर करण्याचे राजकीय कारस्थान रचले आहे. संत भगवान बाबांच्या जयंतीच्या दिवशी गडावर वंजारी समाजाला आरक्षणाबाबत भगवान सेनेने बैठक बोलावली आहे. यामुळे गडाची शांतता भंग होईल. गडावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा भगवान गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी दिला आहे.

Loading...
 भगवान गडाचे महंत डॉ. नादेवशास्त्री सानप यांनी मंगळवारी मुख्यमंत्री, राज्याचे पोलिस महासंचालक, अहमदनगरचे जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हाधिकारी यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. भगवान गडावर संत भगवान बाबांची एकशे बावीसावी जयंती दि.३१ ऑगस्ट २०१८ रोजी साजरी होत आहे. हजारो भाविक भगवान गडावर येणार आहेत. 

भगवानगड हा सर्व जाती-धर्माच्या भाविकांचा श्रद्धास्थान आहे. येथे सामाजिक विषय नको, ही आमची भावना आहे. ग्राविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक बीड जिल्ह्यातील भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी ३१ ऑगस्ट २०१८ वंजारी समाजाला आरक्षणाची बैठक भगवान गडावर होईल, असे जाहीर केले आहे. 

तशा बातम्या बीड जिल्ह्यातील वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. भगवान गडाची शांतता काही प्रवृत्तींना पाहवत नाही. मागील दसरा मेळाव्याचा इतिहास पाहता गडावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिस व महसूल यंत्रणेने याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. 

भगवान गडाची शांतता भंग करण्याची काही राजकीय शक्ती कारस्थान करण्याची शक्यता आहे. याबाबत गडाच्या महंतांनी मुंख्यमंत्री, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिसप्रमुखांना लेखी स्वरुपात निवेदन दिले आहे. 

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळीत गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी कराड यांच्या पाठीमागे असणारी राजकीय शक्ती ही पंकजा मुंडे यांचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंडे व शास्त्री हा थंडावलेला वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.