नोटाबंदी व जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडली -राजेंद्र फाळके

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सत्ताधारी पक्षांनी पोकळ आश्‍वासन देऊन जनतेचा विश्‍वासघात केला आहे. या सरकारमुळे सर्वच क्षेत्रातील नागरिकांमध्ये असंतोषाची भावना आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. तर सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळत असल्याची टिका करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला. तर जिल्ह्याला अनेक मोठ्या नेत्यांचा वारसा लाभला असल्याचे सांगत पक्षा पेक्षा कुणी मोठा नसून, ही भावना मनात ठेऊन प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काम करण्याचे त्यांनी आवाहन केले. 
Loading...नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक अरुणगाव येथे घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना फाळके बोलत होते. नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ (दादा) दरेकर यांनी आयोजित केलेल्या या बैठकीप्रसंगी किसनराव लोटके, अशोक बाबर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, आबासाहेब सोनवणे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवळकर, कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, मोहन बोर्डे, पापामिया पटेल, शरद बडे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष साहेबान जागीरदार, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष अक्षय भिंगारदिवे, युवक तालुकाध्यक्ष मनोज भालसिंग, विनायक जगताप, श्याम कांबळे, अतुल भापकर, रिजवान शेख, रामेश्‍वर काळे, वैभव म्हस्के, अमोल शिंदे, बाळासाहेब रोखले, रमेश वारे, अशोक शिंदे आदिंसह नगर तालुक्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फाळके पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचे ध्येय समोर ठेऊन कार्यकर्त्यांनी बुथ कमिटीवर लक्ष केंद्रित करावे. एक महिन्याच्या आत बुथनिहाय कमिट्या स्थापन करावेत. पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जाणार असून, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून वंचितांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम करण्याचे सांगितले.


प्रास्ताविकात गहिनीनाथ (दादा) दरेकर यांनी नुतन जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न करणार असून, नगर तालुका राष्ट्रवादीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सामाजिक व राजकीय उपक्रमाची माहिती दिली. यावेळी इतर पदाधिकार्‍यांची भाषणे झाली. तसेच राजेंद्र फाळके यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नगर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.