आमदार विजय औटी वादाच्या भोवऱ्यात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय औटी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून अपशब्द वापरल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने आमदार औटी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


Loading...
पारनेर तालुक्यातील वडनेर येथे विकास कामांच्या शुभारंभानिमित्त रविवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेत आमदार औटी यांनी मराठा कार्यकर्त्यांना आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर माझा राजीनामा मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही असे म्हणून अपशब्द वापरले आहेत. 

ही क्लिप सध्या व्हायरल झाली असून मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे,विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागात झालेल्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने खडसावत औटी यांनी अपशब्द वापरल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.