शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी कामाला लागा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यात शिवसेनेची ताकद मोठी असून ती आणखी वाढली पाहिजे यासाठी सर्व शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले.


Loading...
शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात काल अकोल्यात खासदार सदाशिव लोखंडे व सेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.त्याप्रसंगी खेवरे बोलत होते.शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली आहे. 

अकोल्यातही खासदार सदाशिव लोखंडे, उत्तर नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आ. सूर्यकांत शिंदे, संगमनेरच्या संपर्कप्रमुख शुभांगी नांदगावकर, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, डॉ. मनोज मोरे, प्रदीप हासे, नामदेव आंबरे व आदींच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानास सुरुवात झाली.

खेवरे म्हणाले, अकोले तालुक्यात यंदा विक्रमी सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवा आणि कामाला लागा. शिवसेना हा असा पक्ष आहे जो की सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन काम करतो. सर्व अल्पसंख्यांक, जाती धर्माचे लोकांना आजपयंर्त शिवसेनेने न्याय दिला आहे. विचारांशी बांधिलकी जपणारा पक्ष आहे. शिवसैनिक हा सर्वात मोठा पदाधिकारी आहे. जिल्ह्यात गाव तिथं शाखा वाडी तिथं शाखा स्थापन करा, असे आवाहन त्यांनी केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.