पत्नीचे अनैतिक संबंध समोर आल्याने पोलिसाची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलीस दलातीलच पोलीस कर्मचाऱ्याचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या प्रकाराने नैराश्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात झोळीच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री पावणेबारा ते सोमवार रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जळगावातील शिवकॉलनीत घडली. 


Loading...
रूपेश विश्वनाथ पाटील (३३) असे मयताचे नाव आहे. ते यावल पोलीस स्टेशनला कार्यरत होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस कॉन्स्टेबल सागर तडवी याच्यासह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्स्टेबल रूपेश यांचे वडिल विश्वनाथ पाटील हे पोलीस दलात कार्यरत असताना त्यांचा मृत्यू झाला. 

नंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर सन २०११.१२ मध्ये रूपेश पाटील यांना पोलीस दलात भरती करण्यात आले होते. ते सध्या यावल पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. आई, तसेच लहान भाऊ संदीप यांच्यासह ते टागोरनगर परिसरात वास्तव्यास होते. दरम्यान, पो.कॉ.रूपेश यांचा मुलगा ऋषी याची ओेरियन स्कूलमध्ये ॲडमिशन घेतल्याने दहा दिवसांपूर्वी त्यांनी शिवकॉलनीत भाड्याचे घर घेऊन पत्नी, मुलगा यांच्यासह वास्तव्यास आले होते. 


प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार तिसऱ्या रूममध्ये पत्नी व मुलगा ऋषी झोपलेले असताना पहिल्या रूममध्ये येऊन रूपेश पाटील यांनी झोक्याची दोरी गळ्याला आवळून आत्महत्या केली. रात्री त्यांच्या पत्नी झोपेतून उठून पुढच्या रूममध्ये आल्या असता त्यांनी पतीने गळफास घेतल्याचे चित्र बघीतले. 


नंतर त्यांनी तत्काळ ही माहिती त्यांचे दीर संदीप पाटील यांना मोबाईलवरून दिली. कानावर पडलेल्या बातमीने मानसिक धक्का बसलेला भाऊ संदीप याने तत्काळ योगेश सूर्यवंशी यांना टागोरनगर येथील घरी बोलवून घेतले. नंतर कुटुंबासह ते शिवकॉलनीत घटनास्थळी दाखल झाले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.