मनपा निवडणूक - माजी आमदार राठोड यांचे कट्टर समर्थक भाजपच्या वाटेवर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आगामी मनपा निवडणूक भाजपाने स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सेनेचे नगरसेवक मनोज दुल्लम भाजपावासी झाल्यानंतर आता माजी आमदार अनिल राठोड यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे विजय बोरुडे व इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश चिपाडे यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला आहे. 


Loading...
येत्या दोन दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे.अहमदनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पक्षीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. 
Loading...

मनपाची प्रभागरचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी आपापले आखाडे बांधण्यास सुरुवात केली आहे. . आगामी मनपा निवडणूक भाजपाने स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी सुरुवातीला सेनेचे नगरसेवक मनोज दुल्लम यांना भाजपाच्या कळपात ओढून सेनेला सुरुंग लावला आहे. 


त्यापाठोपाठ आता भाजपाने शिवसेनेचे निष्ठावान व अनिल राठोड यांचे कट्टर समर्थक विजय बोरुडे यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बोरुडेंसह इंद्रायणी प्रतिष्ठानचे डॉ. योगेश चिपाडे, मयूर ताठे, दत्ता गाडळकर यांचाही भाजपा प्रवेश निश्चित मानला जात आहे. 


येत्या एक - दोन दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बोरुडेंसह, डॉ. चिपाडे, ताठे, गाडळकर यांचा प्रवेश होणार आहे, अशी माहिती भाजपाचे मध्यशहर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली.सेनेला सोडचिठ्ठी दिलेले दिगंबर ढवण, हनुमान भुतकर, धनंजय जाधव हेही भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.