वादग्रस्त श्रीपाद छिंदमलाही निवडणुकीचे वेध,पालखी मिरवणुकीत सहभागी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेला भारतीय जनता पक्षाचा पदच्चुत उपमहापौर श्रीपाद छिंदम हा चक्क पदम्शाली समाजातर्फे श्री मार्कंडेय महामुनींची नगर शहरातून काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत सहभागी झाल्याने चर्चेचा विषय झाला. 


Loading...
श्रीपाद छिंदम यालाही महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. छिंदम स्वत: निवडणुकीत उतरणार की सौभाग्यवतींना संधी देणार याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान छिंदम आता सार्वजनिक कार्यक्रमात जाहिररित्या सहभागी होऊ लागल्याने शिवप्रेमींमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी श्रीपाद छिंदम याने अवमानकारक शब्दप्रयोग केला होता. तशा प्रकारची मोबाईल संवादाची क्लीप व्हायरल झाली होती. म्हणूनच छिंदमविषयी असंतोषाचा भडका उडाला होता. छिंदमच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली होती. 


काही दिवसासाठी छिंदमला सुरक्षततेच्या कारणास्तव जिल्हाबाहेर हलविण्यात आले होते. शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेता भाजपाने छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामाही घेतला होता. हे प्रकरण ताजे असतानच अथवा शिवप्रेमींच्या भावना ताज्या असतानाच पुन्हा छिंदम सार्वजनिक कायक्रमात भाग घेऊ लागल्याने नगर शहराच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.