ओप्पो आणणार तीन कॅमेरे आणि दोन बॅटरीवाला फोन !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्मार्टफोनची बॅटरी उतरून तो बंद होतो. त्यामुळं चांगलीच गोची होते. स्मार्टफोन युजर्सची हीच समस्या हेरून ओप्पो कंपनी 'ओप्पो आर १७ प्रो' हा स्मार्टफोन आणणार आहे. तीन कॅमेरे आणि दोन बॅटरी हे या फोनचं वैशिष्ट्य आहे. अवघ्या १० मिनिटांत ४० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकेल अशी या फोनची बॅटरी आहे.
Loading...

या फोनच्या एका बॅटरीची क्षमता १८५० एमएएच इतकी आहे. म्हणजेच, एकूण ३७०० एमएएचची बॅटरी ग्राहकांना वापरता येणार आहे. या फोनला सुपरवूक (SuperVOOC) तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळं हा फोन झटपट चार्ज होऊ शकणार आहे. तीन रिअर कॅमेरा असणारा ओप्पोचा हा पहिलाच फोन असेल. या स्मार्टफोनची किंमत ४,२९९ युआन (अंदाजे ४४,००० रुपये) आहे. ऑक्टोबरपासून हा फोन चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.