विकासकामांत नागरिकांच्या त्यागाची भूमिका महत्वाची - मा.आ.कदम


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देवळाली प्रवरा शहरात राजश्री कदम प्रतिष्‍ठाणच्‍या सहकार्याने ओढ्यानाल्‍यांचे रुंदीकरण व खोलीकरण करुन ओढ्यांवर बंधारे तयार करण्‍यात आले. भंडारदरा धरण पुर्ण क्षमतेने भरल्‍यानंतर अतिरिक्‍त पाणी नदी व कालव्‍यांना सोडण्‍यात आले असून या पाण्‍यातुन देवळाली प्रवरा शहरातील ओढ्या नाल्‍यावरील बंधारे भरुन घेण्‍यात आले. बंधारे भरल्‍यानंतर त्‍याचे जलपूजन माजी आ.कदम यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 

Loading...
अध्‍यक्षस्‍थानी जेष्‍ठ नागरीक दत्‍तात्रय नालकर हे होते. तर नगराध्‍यक्ष सत्‍यजित कदम, उपनगराध्‍यक्ष प्रकाश संसारे, माजी नगराध्‍यक्ष मुरलीधर कदम, नगरसेवक शिवाजीराव मुसमाडे, सचिन ढुस, ज्ञानेश्‍वर वाणी, गणी शेख, एकनाथ बनकर, सचिन सरोदे, दशरथ खांदे, कांता कदम, शहाजी कदम, भगवानराव कदम, श्रीकांत कदम, ॲड. मोहनीश शेळके, भगवानराव वरखडे, चंद्रभान कदम, शहाजी कडू, दगडू कडू, विलास पठारे, संभाजी कदम, प्रसाद गायकवाड, सचिन शेटे आदि यावेळी उपस्थित होते.

कदम म्‍हणाले की, देवळाली प्रवरा सोसायटीस पुर्वीचे वैभव प्राप्‍त करुन द्यावयाचे आहे. त्‍यासाठी देवळाली प्रवरा शहरातील सर्व जमिनी ओलीताखाली आल्‍या पाहिजे. राजश्री कदम प्रतिष्‍ठाणच्‍या सहकार्याने नगरपालिका हद्दीतील सर्व ओढ्यानाल्‍यांचे खोलीकरण व रुंदीकरण करुन बंधारे तयार केले आहे. हे बंधारे आज पाण्‍याने भरल्‍याने समाधान वाटत आहे. 

बंधारे तयार करताना ओढ्यानाल्‍याशेजारील जमीन धारकांनी थोड्याफार प्रमाणात जमिनीचा त्‍याग केल्‍याने आज मोठ्या प्रमाणात बंधारे तयार झाले आहे. बंधारे तयार करण्‍यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले असून मुळा धरणातून कालवे व चाऱ्या करण्‍यासाठी त्‍यावेळच्‍या शेतकऱ्यांनी त्‍याग केला नसता तर आज पाण्‍याअभावी शेती पडिक पडली असती. त्‍यामुळेच रस्‍ते, बंधारे व इतर विकास कामे करताना नागरीकांनी त्‍यागाची भूमिका ठेवली पाहिजे असे कदम यांनी सांगितले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.