एसटी वाहकावरील गोळीबारप्रकरणी मुख्य आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भल्या पहाटे जामखेड शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन आजबे यास जामखेड पोलिसांनी पनवेल येथुन अटक केली आहे. गोळीबार प्रकरणी यापुर्वी एका महिलेला पिस्तूलासह अटक केली आहे. 


Loading...
याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दि.१५ ऑगस्ट रोजी जामखेड एसटी आगाराचे वाहक सुग्रीव गहिनाथ जायभाय (वय ४३, रा. लोकमान्य शाळेशेजारी जामखेड) हा घरी कुटुंबीयांसमवेत असताना रात्री सचिन आजबे याचा फोन आला व त्याने नगर रस्त्यावरील एका धाब्यावर त्यांना बोलवले होते. 

यानंतर पैशाच्या व्यवहारातून दोघांचे भांडण झाले व सचिन आजबे याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या जवळील पिस्तूलातून जायभाय यांच्यावर गोळी झाडली. ती गोळी त्यांच्या मांडीवर लागून आरपार गेली. यानंतर सर्व आरोपी घटनास्थळाहून पळून गेले होते. 


याप्रकरणी सचिन आजबे व इतर अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जायभाय यांच्यावर गोळीबार केलेला मुख्य आरोपी सचिन आजबे हा पनवेल येथे असल्याची गुप्त माहिती जामखेड पोलिसांना मिळाली. त्यानूसार पोलीसांनी शनिवार दि २५ रोजी सापळा रचून आरोपीस अटक केली व पुढील तपासाकामी त्याला जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.