सोनईच्या सरपंच, उपसरपंचासह ५ जणांचे सदस्यपद धोक्यात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जात वैधता प्रमाणपत्राबाबत नियम महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांना लागू असल्याने सोनई ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, उपसरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यपद रद्द होणार आहे.


Loading...
सुप्रीम कोर्टात कोल्हापूर महानगरपालिकेच्या १९ नगरसेवकांबाबत या नगरसेवकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष याचिकेबाबत गुरूवारी (दि. २३) १९ नगरसेविकांबाबतचा निकाल देताना राज्य सरकारचा निर्णय अंतिम असल्याने त्यात हस्तक्षेपाला नकार दिलेला असल्याने प्रशासनाने दिलेले निलंबन योग्य असल्याचे निर्देश दिल्याने कोल्हापूरचे १९ नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने खळबळ उडाली आहे व हाच निर्णय सर्वांना लागू होणार असल्याने गावपातळीवरचे ग्रामपंचायत सदस्य पदे धोक्यात आली आहेत.

ऑगस्ट २०१५ मध्ये सोनईसह अनेक लहान-मोठ्या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या होत्या. ग्रामपंचायत अधिनियमानुसार निवडणुकीनंतर 'आरक्षित' जागेवर निवडून आलेल्या उमेदवाराने सहा महिन्यांचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. 


आरक्षित जागेवर 'निर्वाचित' झालेल्या काहींनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले होते; मात्र वेळेत प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे काहींचे पद रद्द करणेप्रकरणे सुनावणी प्रलंबित आहे. आम्हाला जात पडताळणी कार्यालयाकडून मुदतीत प्रमाणपत्रे मिळालेली नसल्याचे शपथपत्र करून देवून वकिलांमार्फत न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यामुळे या सदस्यांचे सदस्यपद काही काळ चालू राहिलेले होते. 


आता मात्र सवोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही सदस्य पदे रद्द होतील.. गुरूवारी न्यायालयाने सरकारचा निर्णय योग्य असल्याचा अभिप्राय दिल्याने निवडणुकीनंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेले परंतु, न्यायालयात याचिका दाखल करून ग्रामपंचायतींवर सत्ता भोगत असलेल्या सदस्य व पदाधिकाऱ्यांना यामुळे दणका बसला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.