'निळवंडे' कालव्यांची कामे रखडण्यास भाजप सरकार कारणीभूत : आ. थोरात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जनतेला खोटी आश्वासने देत भाजपने सत्ता मिळविली. जनता आता भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाही. निळवंडे धरण आपण मंत्रिपदाच्याकाळात पूर्ण केले. कालव्यांचा कामांना भाजप सरकारने पुरेसा निधी दिला नाही. निळवंडे कालव्यांची कामे रखडण्यास भाजप सरकार कारणीभूत आहे, अशी टीका माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. 


Loading...
संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.थोरात म्हणाले, निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपले स्वप्न असून त्यासाठी प्रयत्न सुरु आहे. निळवंडे धरण पूर्ण केले तसे कालवे पूर्ण केले जातील. निळवंडेचे पाणी मिळेपयंर्त मात्र पाणी बचत हीच पाणी निर्मिती ठरणार आहे. 

शेतकऱ्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा. निळवंडे कालव्यांच्या कामाला भाजप सरकारने पुरेसा निधी दिला नाही. त्यामुळे कालव्यांची कामे रखडली आहेत. खोटी आश्वासने देवून सत्ता मिळविणाऱ्या भाजपाला लोक आता थारा देणार नाही, असेही ते म्हणाले.


आ. डॉ. तांबे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्रीपदाच्या काळात निळवंडे धरणाला न्याय दिला. मोठ्या संघर्षातून निळवंडे धरण पूर्ण झाले. भाजप सरकारने निळवंडे कालव्यांना निधी दिला नाही. निळवंडे धरण आमदार थोरात यांनी पूर्ण केले असून कालवे पूर्ण करण्यासाठी साथ द्या, असे आवाहन केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.