श्रीरामपूर तालुक्यासाठी १८ कोटींचा निधी मंजूर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर मतदारसंघातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील नळपाणी पुरवठा योजनेसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल या योजनासाठी श्रीरामपूर व राहुरी तालुक्याला ९ कोटी ७४ लाख ९१ हजार तसेच श्रीरामपूर तालुक्यातील प्रस्तावित कामांसाठी सुमारे १८ कोटी रुपये आ. भाऊसाहेब कांबळे तसेच पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाल्याची माहिती उपसभापती बाळासाहेब तोरणे यांनी दिली.
Loading...

या नळ पाणीपुरवठा योजनाच्या मंजुरीसाठी सभापती दीपक पटारे यांनी सातत्याने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून जिल्हा परिषद अध्यक्षा ना.शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे आ. कांबळे यांच्या माधामातून पाठपुरावा केला. 


या प्रस्तावित योजनेतील भामाठाण, हरेगाव, निमगाव खैरी, उंदिरगाव, गोंदेगाव, नायगाव, मातुलठाण, वांगी बु., वांगी खुर्द, भेडार्पूर, जाफराबाद, भोकर तसेच कडीत व इतर ५ गावे या नळ पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असून सन २०१७-१८ व २०१८-१९ असे एकून २५ कोटी ४९ लाख रुपये श्रीरामपूर तालुक्यासाठी मंजूर असल्याचे उपसभापती तोरणे यांनी म्हटले आहे.


विरोधी पक्ष नेते ना.राधाकृष्ण विखे पाटील व आ. भाऊसाहेब कांबळे यांचे मार्गदर्शन व प्रयत्नांमुळे इतका मोठा निधी उपलब्ध झाल्याचे म्हटले असून अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी त्यासाठी अभिनंदन केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.