राखी बांधण्याआधीच तुटली जीवनाची दोर! विद्याथ्र्याचा शॉक लागून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- घरात रक्षाबंधनाची तयारी सुरू होती. राखी बांधण्यासाठी चुलत भाऊ आदेशला लवकर स्नान आटोपून येण्यास सांगितले. त्यानेही स्नानाची गडबड सुरू केली. मात्र स्नान करताना शॉक लागून भाऊ बेशुद्ध झाला. दवाखान्यात नेण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली. राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्याची कामना करण्यापूर्वीच त्याच्या जीवनाची दोर तुटली. 


Loading...
आदेश अजयराव सोनवणे (२१, शेरा, ता. रेणापूर, जि. लातूर) असे या युवकाचे. 'बीएचएमएस' विद्याथ्र्याचा शॉक लागून मृत्यू नाव असून तो 'बीएचएमएस'च्या द्वितीय वर्षात शिकत होता. सुट्यांत काकाच्या घरी औरंगाबादला आला असताना ही घटना घडली.शिवाजीनगर भागातील रहिवासी मोहन संग्राम सोनवणे (रा. सह्याद्री हिल्स) यांच्या घरी रविवारी रक्षाबंधन सणाची तयारी सुरू होती. 

त्यांचा पुतण्या आदेश हा कॉलेजला सुट्या असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे आला होता. सकाळी आजोबा, काकू आणि चुलत बहिणीने स्नान केल्यानंतर राखी बांधण्यासाठी आदेशलाही लवकर स्नान उरकून घेण्यास सांगितले. त्यामुळे सकाळी ८ वाजता आदेश स्नान करण्यासाठी बाथरूममध्ये गेला. 


एकीकडे राखी बांधण्यासाठी ओवाळणीचे ताट तयार करण्यात येत असतानाच बाथरूममधून जोराचा आवाज आला. काय झाले हे पाहण्यासाठी कुटुंबीयांनी बाथरूमकडे धाव घेतली. काका मोहन सोनवणे यांनी जोरात दरवाजा ढकलला. आतून कडी लावलेली नव्हती. त्यामुळे दरवाजा उघडला गेला. त्यावेळी आदेश जमिनीवर पडल्याचे मोहन सोनवणे यांना दिसले. 


त्यांनी आदेशला तत्काळ बाथरूममधून बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉटरांनी घाटीत दाखल करण्याबाबत सांगितले. बेशुद्धावस्थेत आदेशला घाटीत दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासून १०.१५ वाजता मृत घोषित केले. चुलत भाऊ आदेशला राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करण्याची बहिणीची इच्छा अधुरीच राहिली. 


या घटनेने राखीपौर्णिमेसारख्या आनंदाचा सण सोनवणे कुटुंबीयांसाठी दु:खात बदलून गेला. आदेश हा लातूर येथील एका महाविद्यालयात बीएचएमएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.चार दिवसांनंतर त्याचा द्वितीय वर्षाचा निकाल लागून तृतीत वर्षात जाणार होता.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.