मला राजकारणातून संपवण्यासाठी मतदारसंघाचे विभाजन केले - आ. कर्डिले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना संघर्ष आणि संकट झेलण्याची सवय असतेच. सरपंचपदापासून राज्याचा मंत्री झालो, तेव्हापासून मला संघर्ष करायची आणि आलेल्या संकटांवर मात करण्याची सवय झालेली आहे, त्यामुळे संघर्ष आणि संकटाला आणखी किती दिवस भीक घालायची, असे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले. 

Loading...
संत गाडगे बाबा यांचे शिष्य संत लक्ष्मण महाराजांचे कार्य समाजाला दिशा देणारे असून, गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्याचे काम लक्ष्मण महाराजांनी केले असल्याचे आ. कर्डिले म्हणाले. कौडगाव जांब येथे संत लक्ष्मण महाराजांचा पुण्यतिथी सोहळा अमृत महोत्सव म्हणून साज़रा करण्यात आला. या कार्यक्रमाची सांगता महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने रविवारी झाली. 

याप्रसंगी आ. राहुल जगताप, राष्ट्रीय संत बद्रिनाथ महाराज तनपुरे, महंत शंकर भारती महाराज, दानवे महाराज, मार्केट कमिटीचे सभापती विलासराव शिंदे संचालक दिलीप भालसिंग, बन्सी कराळे, जि. प. सदस्य शरद झोंडगे, पं. स. सदस्य राहुल पानसरे, एकनाथ आटकर, शरद बडे, चेरमन दीपक लांडगे, सरपंच राम पानमळकर, पोपटराव चेमटे, रभाजी सूळ, प्रकाश पालवे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

मला राजकारणातून संपवण्यासाठी मतदारसंघाचे विभाजन केले
आ. कर्डिले पुढे म्हणाले, मला राजकारणातून संपवण्यासाठी मतदारसंघाचे विभाजन केले, तुरुंगात घालण्याचे काम केले. मात्र, संत- महंतांच्या आशीर्वादामुळेच या सर्वांवर मात करून मी पुढे जात आहे. सभामंडपामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडावेत, या हेतूने गावोगावी सभामंडप दिले. मांजरसुंबा आणि कौडगावने वॉटरकप स्पर्धेत मोठे यश मिळविल्याबद्दल आ. कर्डिले यांनी दोन्ही गावच्या सरपंच व ग्रामस्थांचे कौतुक केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------

Powered by Blogger.