संगमनेर तालुक्यात विहिरीत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे (जुनेगाव) येथील गावानजीक असणाऱ्या ५० फूट खोल विहिरीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला. सुजाता लहानू दिघे (वय १५) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

Loading...
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावालगत उत्तरेला असणाऱ्या ५० फुट खोल विहिरीत मृतदेह असल्याचे नजीकच्या रहिवाशांना आढळून आले. 

त्यांनी ग्रामस्थ व पोलिसांना माहिती दिली. विहिरीची अत्यंत दुर्दशा झालेली असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडचण निर्माण झाली होती. अखेर पोलीस व ग्रामस्थांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. . सुजाता लहानू दिघे (वय १५) असे या मुलीचे नाव असल्याचे उघड झाले. 

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत खबर दिली. याप्रकरणी सीआरपीसी १७४ प्रमाणे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.