जामखेड दुहेरी हत्याकांडातील आरोपींना कट्टे पुरविणारा ताब्यात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड येथील दुहेरी हत्याकांडा तील आरोपींना गावठी कट्टा पुरविणारा आरोपी अशोक जाधव यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर येथील अमरधाम परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २९ एप्रिल २०१८ रोजी योगेश अंबादास राळेभात व राकेश अर्जुन राळेभात यांना गावठी पिस्तुलातून गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. 

याप्रकरणी कृष्णा अंबादास राळेभात (रा. मोरवस्ती, जामखेड, ता. जामखेड, जि. अ.नगर) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनूसार सदर घटनेबाबत जामखेड पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

काल रविवार दि. २६ रोजी पो. नि. दिलीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की जामखेड येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपींना गावठी कट्टे पुरविणारा आरोपी अशोक किसन जाधव (वय २७, रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड) हा नगर येथील अमरधाम येथे येणार आहे. 

त्यानूसार एलसीबीच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून अशोक जाधव यास ताब्यात घेतले. जाधव यास पुढील तपासाकामी जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.