सोशल मिडीयावर बदनामीची धमकी देत खंडणी मागणार्यास अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा फाट्यावरील सावतानगर भागातील रहिवाशी सिद्धार्थ राजेंद्र जाधव या महाविद्यालयीन विद्याथ्र्याला फोटो सोशल मिडीयावर टाकून बदनामी करीन अशी धमकी देवून ३० हजाराची खंडणी मागणाऱ्या शेखर दादासाहेब अहिरे यास नेवासा नुकतीच अटक केली.

Loading...

याबाबत जाधव याने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, आपण सावतानगर भागातील पाटाच्या पूलावर २१ तारखेला दुपारी तीन वाजेच्या सुमारास मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो असतांना याठिकाणी शेखर दादासाहेब अहिरे (रा.अहिल्यानगर,नेवासा) हा आला व म्हणाला तुझे फोटो काढलेले आहेत. ते सोशल मिडीयावर टाकतो, बदनामी करतो; अन्यथा ३० हजार रूपये दे तसेच नाही तर कुऱ्हाडीने हातपाय तोडीन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यापूर्वीही चार-पाच वेळा धमकी दिल्याचे जाधव याने म्हटले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.