पाथर्डी -शेवगावचा विकास करण्यासाठी ९८ कोटी रुपयांचा विकास आराखडा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी -शेवगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ९८ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, येत्या वर्षभरात ही सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती आ. मोनिकाताई राजळे यांनी दिली. माळी बाभूळगाव, ता. पाथर्डी येथे जि.प. सदस्या सौ. संध्या आठरे यांच्या माध्यमातून साडेचौदा लाख रुपये खर्चाच्या माळी बाभूळगाव ते भडकेवस्ती रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजप्रसंगी आ. राजळे बोलत होत्या. 

Loading...
अध्यक्षस्थानी सौ. आठरे होत्या. प्रमुख मान्यवर म्हणून माजी जि.प. सदस्य सोमनाथ खेडकर, पं.स. सदस्या मनीषा वायकर, गटनेते सुनील ओव्हळ, सुनील परदेशी, एकनाथ आटकर, युवानेते पुरूषोतम आठरे, रवींद्र वायकर, आरपीआयचे नेते रवींद्र आरोळे, ज्येष्ठनेते रामकिसन काकडे, संजय बडे, रमेश गोरे, नगरसेविका मंगल कोकाटे, उध्दव ससे, सीताराम कुटे, सरपंच विजय बोरुडे, माजी सरपंच संदीप वायकर, हरिभाऊ वायकर, सचिन वायकर आदी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना आ. राजळे म्हणाल्या, मतदारसंघाच्या विकासासाठी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे व पालकमंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून भरीव विकास निधी आणला जात आहे. ३५ गावांसाठी ९२ कोटींची नळयोजना राबवण्यात येणार आहे. प्रत्येकवर्षी ३० ते ३५ किलोमीटरचे रस्ते डांबरीकरणाने जोडले जात आहेत. 

जलयुक्तमधून ३५ बंधारे मंजूर केली आहेत. मतदारसंघातील नळयोजनांना विजेचे भरमसाठ बिल येत असल्यामुळे ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे सोलवर सिस्टिमचा प्रस्ताव तत्काळ दाखल करण्याचे आवाहन आ. राजळेंनी या वेळी केले. मतदारांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.