डेटा आॅपरेटरचा प्रताप, मतदार यादीत लावला सनी लिओनी,कबूतर आणि हरिणीचा फोटो !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उत्तरप्रदेशमधील बलिया इथं एक धक्कादाक घटना समोर आलीये. मतदान यादीत चक्क बाॅलिवूड अभिनेत्री सनी लिओनचा समावेश करण्यात आलाय. एवढंच नाहीतर मतदान यादीत कबूतर आणि हरिणीचाही समावेश आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मतदान कार्ड तयार करणाऱ्या आॅपरेटरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


Loading...
उत्तरप्रदेशमध्ये मतदान ओळखपत्राचे काम सुरू आहे. या दरम्यान मतदान यादी मोठा घोळ समोर आला. मतदाराच्या समोर प्राण्याचे फोटो लावण्यात आले आहे. एवढंच नाहीतर एका मतदाराच्या समोर सनी लिओनचा आक्षेपार्ह फोटो लावण्यात आलाय. माहिती समोर आल्यानंतर निवडणूक कार्यालयात एकच खळबळ उडाली. मतदान यादी लिक झाली असून या यादीत एका 51 वर्षीय महिलेच्या फोटोऐवजी सनी लिओनचा फोटो लावण्यात आलाय. तर एका 56 वर्षीय पुरुषाच्या फोटोच्या ऐवजी हत्तीचा फोटो लावण्यात आलाय.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.