महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचाच महापौर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पक्षसंघटना वाढविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न केले जातील. बुथ कमिट्या स्थापन करुन दक्षिण लोकसभा मतदार संघात पक्षाची ताकद वाढविली जाईल. 


Loading...
सध्या जिल्ह्यात पक्षाला चांगले वातावरण असून त्याचा विचार करता आगामी महानगरपालिका निवडणुकीत नगरचा महापौर आमच्या पक्षाचाच राहील, असा आशावाद राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बोलून दाखविला.

जिल्हा राष्ट्रवादी भवनात राजेंद्र फाळके यांनी मावळते जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी कार्याध्यक्ष संदीप वर्पे, मावळते कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, आ. संग्राम जगताप ,माजी आमदार पांडुरंग अभंग, दादाभाऊ कमळकर, प्रा. माणिकराव विधाते आदि उपस्थित होते..

आगामी होणार्‍या महानगरपालिका निवडणुकीत ही आमच्याच पक्षाचा महापौर होईल यामध्ये माझ्या मनात तीळमात्र शंका नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.आगामी काळात पक्षापासून दुरावलेंल्या व पक्ष सोडून गेलेल्याना पुन्हा पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करु .


आगामी काळात जिल्हातील विरोधी पक्षाना झटका देणार असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी काळात तालुकानिहाय दौरे करून पक्षसंघटना वाढीसाठी भर देणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी यावेळी पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे सोने करीन असा निर्धार व्यक्त केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.