आता ई-मेल मागे घेण्याची सुविधा उपलब्ध


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एकदा ई-मेल पाठवला की तो मागे घेता येत नसल्यामुळे एखादी चूक झाल्याचे नंतर लक्षात आल्यास वा चुकीच्या व्यक्तीला मेल गेल्यास तो रद्द करता येत नसल्याची मोठी अडचण सध्या आपणास भासते. गुगलने मात्र आपली ही अडचण 'अनडू सेंड' नामक फिचरच्या माध्यमातून आता दूर केली आहे. 


Loading...
अशी सुविधा यापूर्वी ही सुविधा केवळ 'जी-मेल'च्या 'आयओएस'धारकांसाठीच उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आता ही सेवा 'ॲण्ड्रॉईड' धारकांसाठीही उपलब्ध झाली आहे. 'ॲण्ड्रॉईड'धारकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात हे फीचर उपलब्ध करण्याची मागणी होत होती. 

बऱ्याच चाचण्यांनंतर दोन वर्षांपूर्वी (२०१६) 'गूगल'ने 'अनडू सेंड'हे फीचर 'आयओएस'धारकांसाठी उपलब्ध करून दिले. या फीचरच्या मदतीने पाठवण्यात आलेले मेल रद्द करण्याची सुविधा देण्यात आली. हे फीचर 'डेस्कटॉप व्हर्शन'प्रमाणे कार्यरत राहणार आहे. 'ई-मेल' पाठवल्यानंतर एक खिडकी उघडणार आहे. 


या खिडकीवर 'सेंडिंग' असे दिसेल. या शिवाय पाठवलेला मेल रद्द करण्याचीही सुविधा दिसेल. ई-मेल गेल्यानंतर 'अनडू सेंड' हा पर्याय दिसण्यास सुरुवात होईल. 'जीमेल'च्या ८.७ या व्हर्जनच्या मदतीने या फीचरचा उपयोग सर्वांना करता येणार आहे. जर हे फीचर दिसत नसेल तर, 'गुगल प्ले स्टोर'वर जाऊन ॲप अपडेट झाले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.