शिर्डीत चिमुकलीला सोडून आई गेली निघून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी साई दर्शनाच्या निमित्ताने आलेल्या नाशिक येथील एक महिला आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीला गुरूवारी (दि. २३) दुपारी बारा वाजेच्या सुमारास नगरपंचायतीजवळ सोडून निघून गेली. यासंदर्भात चिमुकलीने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी तिच्या आईचा शोध घेतला. मात्र शोध लागला नाही. 


Loading...
सदर चिमुकलीची रवानगी नगरच्या बालसुधारगृहात करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.. याबाबत अधिक माहिती अशी : शुभा प्रसाद शर्मा (रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असा पत्ता सांगणारी पाच वर्षाची चिमुकली नगरपंचायतसमोर रडत उभी होती. यावेळी लोकांनी तिची विचारपूस केली असता तिची आई सोनी हिने साई दर्शनासाठी आणले व आपल्याला येथे सोडून निघून गेल्याचे रडत रडत सांगितले. 

तसेच वडिलांचे निधन झालेले असून अथर्व नावाचा लहान भाऊ असल्याचे सांगितले. नागरिकांनी तत्काळ याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चिमुकलीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने सायंकाळपर्यंत तिच्या आईचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. त्यामुळे शुभाला नगरच्या बाल सुधारगृहात दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.