दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सहा वर्षांनंतर गजाआड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील नान्नज येथे सराफाच्या दुकानावर दरोडा टाकणाऱ्या आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आवड्या ऊर्फ सहदेव ऊर्फ अमर सुभाष भोसले असे त्याचेे नाव आहे. त्याचा साथीदार संतोष दशरथ चव्हाण (दोघे वलघूड, ता. श्रीगोंदे) याला तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली. 


Loading...
दोघेही सहा वर्षांपासून फरार होते. नान्नज येथील सराफ व्यावसायिक अमोल दत्तात्रय पंडित यांच्या दुकानावर १५ ते २० जणांनी दरोडा टाकून ११ लाख १० हजारांचा एेवज लांबवला होता. ही घटना १९ डिसेंबर २०१२ ला घडली. दोन्ही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून राहात असल्याने ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. 

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांचे पथक श्रीगोंदा तालुक्यात फरार आरोपींचा शोध घेत असताना संतोष हा वलघुड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. त्यानंतर गुरूवारी दुसरा आरोपी आवड्या हा नगरमधील सावेडी भागात आल्याची माहिती पवार यांना मिळाली. 


पवार यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे, पाेलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल चव्हाण, अंकुश ढवळे, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, दिगंबर कारखिले, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, सचिन अाडबल, सचिन कोळेकर यांनी ही कामगिरी केली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.