कालव्याच्या पाईपला गळफास घेऊन एकाची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर शहरापासून जवळच असलेल्या दत्तनगर शिवारात ४५ ते ५० वर्षे वयाच्या अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. 


Loading...
याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी एक सव्वा वाजेच्या सुमारास दत्तनगर जवळील कालव्यावरून जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या पाईपला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका ४५ ते ५० वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे कालव्याला सध्या पाणी सुरू असून वाहत्या पाण्यात या व्यक्तीने दोरी कधी बांधली व आत्महत्या का केली हे कोडे आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.