श्रीरामपूर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे द्या, आमदार निवडून आणू - अविनाश आदिक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने पक्ष विस्ताराला मर्यादा येतात. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याकडे घ्यावा. येथून पक्षाचा आमदार विजयी करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले. 


Loading...
काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ संकल्पना मेळाव्याप्रसंगी आदिक बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, युवक आघाडीचे नेते कपिल पवार, कामगार नेते नितीन पवार, अर्चना पानसरे आदी उपस्थित होते. 

आदिक म्हणाले, जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. मतदारसंघ राखीव आहे. गेल्या काही वर्षांपासून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत; मात्र मित्र पक्षाच्या भूमिकेत असल्याने काही मर्यादा येत आहेत. अशावेळी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यास पक्ष विस्ताराला वाव मिळेल. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पक्ष नेतृत्वाकडे त्याकरिता प्रयत्न करावेत. 


जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले, पक्षाची ध्येयधोरणे तरूणांपर्यंत नेण्याचे आवाहन आपल्यासमोर आहे. राष्ट्रवादीच्या कुशल नेतृत्वाने सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांप्रती घेतलेल्या चांगल्या निर्णयांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्याच नेतृत्वाखाली आपण घडलो आहोत. त्यामुळे पुढील काळात जिल्हाध्यक्ष या नात्याने पक्षवाढीसाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करू, असे ते म्हणाले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.