अपहरण प्रकरणातील आरोपीस नुकसानभरपाईची शिक्षा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अपहरण प्रकारणातील आरोपी पुरुषोत्तम वासुदेव डफळ (वय 45) यास न्यायालयाने भादवी कलम 323 प्रमाणे दोषी धरत त्याला 10 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. 
Loading...

सुनावणीअंती न्यायाधीशांनी आरोपीस फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून दहा हजार रुपये देण्याची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. आरोपी हा अर्धांगवायूने आजारी असल्यामुळे व त्याच्याविरुद्ध यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यामुळे न्यायालयाने प्रोबेशन ऑफेडन्स ॲक्टप्रमाणे जखमी फिर्यादीस 10 हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.