सोनईत अवैध हातभट्टी अड्ड्यांवर पोलिसांचे छापे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास देशमाने व पथकाने सोनई पोलीस ठाणे हद्दीत चांदा व कौठा येथे अवैध हातभट्टी दारू निर्मिती धंद्यावर छापे टाकून तयार हातभट्टी व त्यासाठी लागणारे ५५ हजार रुपयांचे रसायन मुद्देमाल नष्ट करून तिघांवर कारवाई केलेली आहे. 
Loading...

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चांदा व कौठा येथे गावठी हातभट्टीचे धंद्याबाबत माहिती मिळाल्याने सोनई पोलीस पथकाने चांदा (ता.नेवासा) येथे छापा टाकून १२ लिटर तयार हातभट्टी किमत ६०० रूपयांसह राजू नामदेव भालके याला ताब्यात घेतले. 


कौठा (ता.नेवासा) येथे अवैध गावठी दारू निर्मिती स्थळी छापा टाकून २० लिटर तयार गावठी हातभट्टी दारु व दारु तयार करण्यासाठीचे २२ हजार रुपये किमतीचे ७०० लिटर कच्चे रसायनासह दास सुरतमल भोसले (रा.कौठा) यास ताब्यात घेतले. तसेच कौठा येथेच दुसऱ्या हातभट्टी निर्मिती धंद्यावर छापा टाकून ४० लिटर गावठी हातभट्टी दारु व दारु तयार करण्यासाठी लागणारे एक हजार लिटर कच्चे रसायन किमत ३२ हजार रुपये यासह अजित बाळासाहेब थोरात (रा.चांदा) याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.