नगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १२ जणाविरूध्द गुन्हा दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील मोहनबाग येथील राम शिंदे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी छापा टाकत तब्बल १ लाख १९ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच याप्रकरणी बारा जणांना ताब्यात घेतले आहे.


Loading...
शहर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहनबाग परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. . यावेळी अदित्य सोमनाथ टाक (वय २० रा. पोलिस मुख्यालया मागे), ज्ञानेश्वर मच्छिंद्र दौंडकर (वय ३२, रा.तोफखाना), राजेश सतिष चव्हाण (वय ६० रा.एसटी कॉलनी गेटजवळ),नंदू एकनाथ दातरंगे (वय ५८रा.दातरंगे मळा), राजेश सकीमल चंदानी (वय ५४ रा.बोरुडे मळा), गणेश रामचंद्र राजपूत (वय ५४ र.गवळीवाडा), राजू चंद्रकांत टेके (वय ४३ मल्हार चौक), विनोद भूमय्या जोग (वय ४२ रा.शेरकर गल्ली,सर्जेपुरा.) श्रीकांत मोहन तारू (वय ३७, रा.टांगे गल्ली), राजू अशोक खाडे (वय ३६, रा.भाजी मार्केट), शंकर नारायण जमाल (वय ५२, रा. शिवाजीनगर), कुमार किसन छाबडीया (वय ५८ रा.ताराबाग कॉलनी)यांच्या विरुद्द गुन्हा दाखल केला आहे. 

या कारवाईत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके,पोसई तारडे, पोहेकॉ.मोरे, पोना.वाकचौरे,पोना फसले, पोना जाधव, हेकॉ.गिरवले, पोकॉ.देशमुख, पाकॉ.जाधव, पोकॉ.मोरे, पोकॉ.आंधळे, पोकॉ.धावटे पोकॉ. पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.