पाथर्डीत मुलींची शुटिंग काढणाऱ्या तरूणास नागरिकांनी चोपले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे महाविद्यालय सुटल्यानंतर मुलींची शुटिंग काढणाऱ्या तरूणास ग्रामस्थांनी पकडून बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तिसगाव येथील अकरावी बारावीचे कॉलेज सुटल्यानंतर काही मुली खाजगी क्लासकडे जात होत्या. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघा तरुणांनी या मुलींची वृध्देश्वर चौकापासुन पुढे मैड सराफ पर्यंत मोबाईलमध्ये शुटिंग काढली.


Loading...
मात्र हा संपूर्ण प्रकार पुढे चाललेल्या काही मुलींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच जवळच असलेले चप्पल दुकानदार गणेश गारदे यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर गारदे यांनी तत्काळ या दोघा तरूणांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकास पकडले दुसरा मात्र मोटारसायकलसह पसार झाला. पकडलेला तरूण मांडवे गावचा आहे. आणि मुलींची छेड काढण्यासाठी तो नगरहुन तिसगावला आला होता. 

मुलींची छेडछाड झाल्याची माहिती समजताच तिसगावमधील अनेक तरूणांनी या पकडून ठेवलेल्या तरुणास बेदम चोप दिला. यावेळी मोठी गर्दी येथे जमली होती. पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब लवांडे शिक्षक नेते महेश लोखंडे यांनी घटनास्थळी येवून वृध्देश्वर विद्यालयाच्या शिक्षकांना चांगलेच धारेवर धरत अनेक शाळाबाळ्य तरूण विद्यालयाच्या आवारात येवून मुलींची छेड काढतात त्यांच्यावर तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली. बाहेरच्या तरूणांची शाळा परिसरात येण्याची हिंमत होतीच कशी, छेड काढणाऱ्या किती तरूणांवर तुम्ही पोलीस कारवाई केली. अशा अनेक प्रश्नांचा भडीमार या शिक्षकांवर केला. तासाभराने पोलीस आल्यानंतर या तरुणास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.