देशातील जनतेला भाजपचे खरे रुप समजले - आ.बाळासाहेब थोरात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- काँग्रेसला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा लाभली आहे. खा. राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या शक्ती App मुळे युवकांचा थेट पक्षाध्यक्षांशी संवाद होणार असून काँग्रेस पक्षाचा विचार हा सर्वांना पुढे घेवून जात देशाच्या एकात्मता व प्रगतीसाठी असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.


Loading...
आ. थोरात यांचे यशोधन संपर्क कार्यालय येथे आयोजित काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, उत्तर महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्ष ईशादभाई जहागिरदार, प्रदेश उपाध्यक्ष शहाजी सावंत, मुन्नाभाई चमडेवाले, सभापती अजय फटांगरे, रईसखान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. 

आ. थोरात म्हणाले की, काँग्रेस हा देशाचा प्रगतीचा विचार आहे. सर्वधर्मसमभाव व एकात्मता हीच काँग्रेसजनांची मोठी ओळख आहे. पक्षाध्यक्ष खा. राहुल गांधी यांचे नेतृत्वाखाली आगामी काळात काँग्रेसला पुन्हा वैभवशाली दिवस येणार आहे. एकात्मता हा संघटनेचा पुरोगामी विचार वाढविण्यासाठी युवा शक्ती एकवटली पाहिजे. 


अल्पसंख्यांक सेल हा सर्वसामान्याला प्रतिनिधित्व देणारा आहे. या सेलच्या माध्यमातून उपेक्षित वर्गासाठी मोठे काम कारण्यास वाव आहे. भाजपाच्या भूलथापांना आता लोक कंटाळले आहे. ते खोटे बोलतात पण रेटून बोलतात. आपण त्यांना खऱ्या कामानेच उत्तरे द्या. मागील महिन्यातील अविश्­वास ठरावाच्या वेळी लोकसभेत खा. राहुल गांधींनी विचारलेल्या एकाही प्रश्­नाला पंतप्रधान मोदींना उत्तरे देता आली नाही. 


देशातील जनतेला भाजपचे खरे रुप समजले आहे. युवा पिढीही भाजपाच्या विरोधात आहे. आपले काम प्रामाणिक करा. विचारांशी एकनिष्ठ रहा तुम्हाला पक्षात चांगले मानाचे स्थान राहिल असेही ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी अल्पसंख्यांक समाजाचे नागरीक, युवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.