भाजप नेत्यांच्या घरातून चोरट्यांनी सुमारे 16 लाख रुपयांचा ऐवज केला लंपास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बंद घराचा कटरच्या सहाय्याने कडी कोयंडा तोडून घरातून चोरट्यांनी सुमारे 16 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री कर्जत तालुक्‍यातील मिरजगावमधील श्रीकृष्ण गल्लीत घडली. 


Loading...
भाजप नेते डॉ. रमेशचंद्र झरकर यांच्या घरात ही चोरी झाली. मिरजगाव येथील भाजप नेते डॉ. रमेशचंद्र झरकर हे आपल्या मुलीकडे मुंबई येथे गेले होते.मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सार्थक बंगल्याचे मुख्य प्रवेशव्दार तोडुन घरात प्रवेश केला. 

घरातील लोखंडी कपाट तोडुन कपाटातील सोन्याचे दागिने, कोटाची सोन्याची बटने असा अंदाजे सोळा लाखांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. नगर येथुन आलेल्या श्‍वानपथकाने नागलवाडी रस्त्यापर्यंत माग काढला. चोरटे या ठिकाणावरून वाहनातून पळुन गेले असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.