२३ अाॅगस्टला ज्या स्मशानभूमीचे लाेकार्पण केले तिथेच कामत यांच्यावर अंत्यसंस्कार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुंबई काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या पार्थिवावर गुरुवारी शासकीय इतमामात चेंबूर येथील चरई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कामत यांना त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला. त्यापूर्वी सकाळी पार्थिव अंतिम दर्शनसाठी त्यांच्या चेंबूर निवासस्थानी ठेवण्यात आले होते. 


Loading...
नवी दिल्ली येथे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने गुरुदास कामत यांचे निधन झाले होते. बुधवारी रात्रीच त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. 

भाजपचे मंत्री प्रकाश मेहता, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,माजी मंत्री नसीम खान या वेळी हजर होते. चरई स्मशानभूमीचे लाेकार्पण गुरुदास कामत यांच्या हस्ते २३ अाॅगस्ट २००९ राेजी झाले हाेते, त्याच स्मशानभूमीत व २३ अाॅगस्ट राेजीच कामत यांना अखेरचा निराेप देण्यात अाला हा अनाेखा याेगायाेग.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.