संतप्त ग्रामस्थांनी महापालिकेच्या मुख्यालयात टाकला जैव कचरा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील बेकायदेशीर कत्तलखाण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेचा उदासीन कारभार गुरुवारी चव्हाट्यावर आला आहे. अनधिकृत कत्तलखान्यातील जैव कचरा, प्राण्यांचे अवशेष भरून बुरुडगाव येथील कचरा डेपोच्या दिशेने निघालेला ट्रॅक्टर संतप्त ग्रामस्थांनी अडवून नऊच्या सुमारास महापालिकेत आणून ओतला.


Loading...
जैव कचऱ्यामुळे महापालिका परिसरात दुर्गंधी पसरली होती.शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने राजरोसपणे सुरू असून ड्रेनेज लाईन प्राण्यांच्या अवशेषांमुळे तुंबत आहेत. प्रशासनाने यापूर्वीही कत्तलखाने सिल केल्याचा देखावा केला होता. मात्र शहरात राजरोस प्राण्यांच्या बेकायदेशीर कत्तली सुरू असून, जैव कचरा कोणतीही प्रकारची विशेष काळजी न घेता सर्रासपणे उघड्यावर फेकला जात आहे. 

त्यामुळे कचरा डेपोच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बुरुडगावच्या दिशेने शहरातील एक ट्रॅक्टर ट्रॉलीभर प्राण्यांच्या जैव कचरा घेऊन बुरूडगाव कचरा डेपोत येताना येथील नागरिकांना दिसला. विशेष म्हणजे तब्बल एक किलोमिटर अंतरापासूनच रस्त्यावरच या ट्रॉलीतील प्राण्यांचे अवशेष गळत होते.


या प्रकराने आधीच वैतागलेल्या गावकऱ्यांनी हा ट्रॅक्टर रस्त्यातच अडवून हा कचरा उचलून घेण्याचे सांगत महापालिका प्रशासनालाही कळवले. परंतु सकारात्मक प्रतिसाद येत नसल्याने, संतप्त ग्रामस्थांनी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास हा ट्रॉलीभर जैव कचरा थेट महापालिकेच्या मुख्यालयातच आणून टाकला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.