राज्यातील एक हजार ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यातील विविध २६ जिल्ह्यांमधील १ हजार ४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच ६९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी गुरुवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. 

Loading...
ऑक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होत आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. त्यासाठी ५ ते ११ सप्टेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील.

त्यांची छाननी १२ सप्टेंबरला नामनिर्देशनपत्रे १५ सप्टेंबरपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. २६ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात यासाठी ३ वाजेपर्यंतचीच वेळ असेल. मतमोजणी २७ सप्टेंबर रोजी होईल. 

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या - 
ठाणे- ६, रायगड- १२१, रत्नागिरी- १९, सिंधुदुर्ग- ४, नाशिक- २४, धुळे- ८३, जळगाव- ६, अहमदनगर- ७०, नंदुरबार- ६६, पुणे- ५९, सोलापूर- ६१, सातारा- ४९, सांगली- ३, कोल्हापूर- १८, बीड- २, नांदेड- १३, उस्मानाबाद- ४, लातूर- ३, अकोला- ३, यवतमाळ- ३, बुलडाणा- ३, नागपूर- ३८१, वर्धा- १५, चंद्रपूर- १५, भंडारा- ५ आणि गडचिरोली- ५.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.