खड्डेमय लींक रोड बनला मृत्यूचा सापळा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर-सोलापूर अरणगाव बायपास रस्त्याच्या (लींक रोड) झालेल्या दुरावस्थेमुळे सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याची महाराष्ट्र राज्य अवजड वाहतूक सेनेचे सरचिटणीस इंद्रपालसिंग मारवा यांनी नुकतीच पहाणी करुन, सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन दिले.
Loading...

अवजड वाहतूक सेनेचे मारवा नगर दौर्‍यावर आले असता काही ग्रामस्थांनी या रस्त्याची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. त्यांनी या रस्त्याची समक्ष पहाणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य अवजड वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, नगरसेवक योगीराज गाडे, बलभीम मोरे, अनिल परभणे, गिरिष शर्मा, शहाजी पाटील आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नगर-सोलापूर अरणगाव बायपास रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर एक ते दीड फुटाचे मोठ-मोठे खड्डे असल्याने या रस्त्याने जाणार्‍या अवजड वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे नुकसान व लूटमार सारख्या घटना घडत असून, 
दुचाकी वाहनांना या रस्त्याने जाणे अवघड बनले आहे. पावसाळा सुरू असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.