धनादेश न वटल्याने एकास शिक्षा व दंड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी येथील डॉक्टर्स, केमिस्ट पतसंस्थेला दिलेला धनादेश न वटण्याच्या कारणावरून बँकेचे कर्जदार बाळासाहेब रामचंद्र आढाव यांना राहुरी न्यायालयाचे न्यायाधीश बी. एम. कोठावळे यांनी २ महिन्याची शिक्षा व २४ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

Loading...

याबाबत संस्थेने माहिती दिली, की बाळासाहेब रामचंद्र आढाव यांनी राहुरी तालुका डॉक्टर्स- केमिस्ट अर्बन क्रेडिट सोसायटी यांच्याकडून १ जानेवारी २००७ साली ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. पतसंस्थेने कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करूनही त्यांनी कर्जभरणा केला नाही. 


कर्ज वसुलीस १५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. तो बॅँक ऑफ महाराष्ट्र येथे भरला असता न वटता परत आल्याने पतसंस्थेने त्यांच्या विरूद्ध राहुरी न्यायालयात दावा दाखल होता. दाव्याची सुनावणी राहुरी न्यायालयात झाली. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा दिली आहे. संस्थेच्या वतीने ॲड. ए. बी. किनकर यांनी काम पाहिले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.