संगमनेर तालुक्यातील युवकाचा रेल्वेतून पडून मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नाशिकरोड शिवारातील गुरेवाडी दरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडून जबर मार लागल्याने संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे (भागवतवाडी) येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Loading...
नाशिकरोड येथील रेल्वेचे उपस्टेशन प्रबंधक राजेंद्र गरुड यांना काशी एक्स्प्रेसच्या (गाडी नंबर १५०८ अप) चालकाने मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रेल्वे लाइनवरील १८८/६ खांबाच्या अपरोडच्या रेल्वे लाइनच्या बाजूला युवकाचा मृतदेह पडलेला असल्याचे सांगितले. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता त्यांना युवकाचा मृतदेह आढळून आला. 

मृतदेहाच्या खिशात असलेला मोबाइल खराब होता. मात्र, खिशात असलेल्या आधारकार्डच्या सहाय्याने पोलिसांनी नातेवाइकांचा शोध लावला. त्यानंतर सदर युवक संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे (भागवतवाडी) येथील शिवाजी ज्ञानदेव भागवत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविला. 


याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने मार लागून सदर युवकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मयत शिवाजी भागवत याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. तो कामानिमित्त सिन्नर येथे नातेवाईकांकडे रहात होता. भागवतवाडी येथे शोकाकूल वातावरणात मयत शिवाजी भागवत याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.